Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडकाँग्रेसच्या अस्तित्वासाठी राजाभाऊ श्रीवर्धनमधून लढणार...राजाभाऊंची निशाणी लिफाफा म्हणजेच आहेराचे पाकीट... 

काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राजाभाऊ श्रीवर्धनमधून लढणार…राजाभाऊंची निशाणी लिफाफा म्हणजेच आहेराचे पाकीट… 

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

कोकणात काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर उर्फ राजाभाऊ  यांनी आधी श्रीवर्धन आणि नंतर अलिबाग अशा दोन मतदारंसघातून स्वत्रंत उमेदवारी अर्ज दाखल केला… श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राजाभाऊ ठाकूर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती वरिष्ठानी केली…तो पाठवलेला विनंती अर्ज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजाभाऊ ठाकूर यांनी टराटरा फाडून टाकला… कोकणात विशेषतः श्रीवर्धनमध्ये काँग्रेसचे अस्तित्व दाखवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवून जिंकणार असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी जाहीर केले…अलिबागमधून जरी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी श्रीवर्धनमधून आपण लढणार आहोत… महाविकास आघाडी व शेकापचा राजाभाऊंना पाठिंबा असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले…शेकाप नेते जयंत भाई पाटील यांनी तुम्ही अलिबाग विधानसभा मतदार संघातून अर्ज मागे घ्या…तसेच श्रीवर्धनची जागा लढा…आम्ही  तुम्हाला शेकापकडून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पूर्णपणे पाठींबा देऊ असे सांगितले आहे…   रोहा, तळा, माणगाव आणि श्रीवर्धन काँग्रेस अध्यक्षांसह म्हसळा शहर काँग्रेस महिला अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विधानसभा अंतर्गत येणारे पाच काँग्रेस अध्यक्ष यांनीही तसेच जमलेल्या बहूसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजाभाऊ ठाकुर यांना एकमुखी पाठिंबा दिला…राजाभाऊ ठाकूर यांचे शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले…म्हसळा नगर पंचायतचे नगरसेवक सूफियान यांनी उपस्थीत सर्वांचे स्वागत करुन म्हसळा काँग्रेस शहर पक्षातर्फे राजाभाऊ ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले … यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. नरेंद्र सिंह, राजा भाऊ ठाकूर यांचे चिरंजीव सम्राट राजा भाऊ ठाकूर, श्रीवर्धन काँग्रेस पदाधिकारी गणपत गमरे, मोहम्मद सईद डावरे, शेहबाज हजवाने, गौतम पवार, नविद हजवाने, निष्ठावंत कार्यकर्ते फारुख परकार सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यानचा काळात राजा भाऊ ठाकूर यांना निवडणूकीत ” लिफाफा ” हे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. महेश पाटील यांनी बहाल केले आहे… दरम्यान लिफाफा हे निवडणूक चिन्ह म्हणजेच प्रेमाचे आहेर पाकीट असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले….राजाभाऊंची निवडणूक निशाणी आहेर पाकीट हे मतदारसंघात लोकांच्या घराघरात पोहचविले जाईल… असेही कार्यकर्ते शेवटी म्हणले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments