रायगड शिवसत्ता टाइम्स ( वार्ताहर ) :-
रायगड जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना एकंदरीत रंगताना पहायला मिळतोय.अशातच नवीन स्थापन झालेल्या बळीराज सेना पक्षाचे यंदा महाराष्ट्र राज्यात 11 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातून सुध्दा या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष असलेले कृष्णा कोंबनाक हे श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभा लढवत आहेत. त्यांची थेट लढत माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याशी होणार आहे. माझी 25 वर्षांची सामाजिक राजकीय कारकीर्द असल्याने याच्या बळावर मला जनतेचा पाठिंबा मिळत असून ही विधानसभा मी जिंकेनच असा विश्वास कृष्णा कोबनाक यांनी व्यक्त केलाय. शिवाय तटकरे कुटुंबावर सुद्धा त्यांनी यावेळी टिकास्त्र सोडत तटकरे परिवारातील राजकारणात असलेल्या सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पाच वर्षात 75 कोटींचा कोणता विकास केला शिवाय या कोट्यवधी रुपयांचा कोणताच अहवाल आजतागायत जनतेला दिला नसल्याचे देखील त्यांनी वक्तव्य केले…