Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडबॅरिस्टर अंतुलेंचा आशीर्वाद राजाभाऊंच्या पाठीशी...अंतुलेंच्या कबरीला वंदन करून राजाभाऊंचा प्रचार... राजाभाऊ ठाकुरांनी काँग्रेसमध्ये जबरदस्त...

बॅरिस्टर अंतुलेंचा आशीर्वाद राजाभाऊंच्या पाठीशी…अंतुलेंच्या कबरीला वंदन करून राजाभाऊंचा प्रचार… राजाभाऊ ठाकुरांनी काँग्रेसमध्ये जबरदस्त जान आणली 

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

विधानसभा निवडणुकीत कोकणात काँग्रेसला एकही जागा सोडण्यात आली नाही… एकेकाळी स्वर्गीय बॅरिस्टर अंतुलेंच्या काळात कोकण काँग्रेसचा बालेकिल्ला होता…त्यामुळे काँग्रेसला पुनःश्च ताकद देण्याचे काम राजाभाऊ ठाकूर करीत आहेत… त्या अनुषंगाने त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला..स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांच्या या अचाट धाडसाचे कौतुक होत आहे… तरुणच नव्हे तर महिला-पुरुष आणि वयोवृद्ध काँग्रेसजन राजाभाऊंच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत…

अर्ज दाखल केल्यानंतर राजाभाऊंना आहेराचे पाकीट म्हणजेच लिफाफा हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले… यानंतर राजाभाऊंनी थेट कार्यकर्त्यांसह माणगाव तालुक्यातील आंबेत गाव गाठून स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांचे आशीर्वाद घेतले …बॅरिस्टर अंतुलेंच्या कबरीसमोर राजाभाऊ नतमस्तक झाले… त्यांनी बॅरिस्टर अंतुले आणि त्यांच्या पत्नी स्वर्गीय नर्गिस अंतुले यांना फुलांची माला अर्पण केली…  राजाभाऊंनी चादर चढवून स्थानिक नागरिकांसोबत प्रार्थना केली…उपस्थित कार्यकर्त्यांनी “अमर रहे, अमर रहे, बॅरिस्टर अंतुले अमर रहे अशा घोषणा दिल्या…

यानंतर  स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले यांचा सहवास लाभलेल्या वयोवृध्द नागरिकांसोबत त्यांच्या घरी जावून राजा भाऊ ठाकूर यांनी आशीर्वाद घेवून चर्चा केली… यावेळी त्यांच्यासोबत शब्बीर रहाटविलकर, शब्बीर जाटम, वसीम डावरे, फरीद उभारे, फारूख उभारे, इक्बाल ठोखन, नाजिम अधिकारी, माजीद खान जुमल, रशीद कुनके, एम. सय्यद डावरे, मुनाफ मुरुडकर , रफिक मुरूडकर आणि अमर विजय बुरुंकर उपस्थित होते.. काँग्रेस जिल्हा सचिव डॉ. नरेंद्र सिंह आणि माणगाव ता. काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे प्रचारात राजाभाऊंसोबत कायम आहेत … राजाभाऊंच्या उमेदवारीने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात नव्हे तर रायगड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये जान आली आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments