चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, युबाठा गटाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भाई शिंदे आणि उबाठा गटाचे कर्जत खालापूर संपर्क प्रमुख आणि खोपोली नगर पालिकाचे माजी नगराध्यक्ष डॉ.सुनील पाटील यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केल्याने महायुतीचे उमेदवार आमदार महेन्द्र थोरवे यांचे पारडे जड झाले आहे…विधानसभा निवडणुक उमेदवारी भरलेले अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता.कर्जत खालापूर विधानसभा महायुतीचा मेळावा आज कर्जत पोसरी येथे तुफान गर्दीत संपन्न झाला.यावेळी डॉ. सुनिल पाटील, सुरेश टोकरे आणि भाई शिंदे यांचा पक्ष प्रवेश त्यांच्या समर्थकांसह मोठ्या प्रमाणात झाला. यावेळी डॉ.सुनिल पाटील यांना शिवसैनिकांनी खांद्यावर घेऊन वाजत गाजत सभा स्थानी आणले.सुरेश टोकरे हे आगरी समाजातील मोठे नेतृत्व आहे. रायगड जिल्हा परिषद चे अध्यक्ष असताना त्यांनी सर्व सामान्य जनतेसाठी काम केले असून सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारा नेता म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. डॉ.सुनील पाटील हे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे राज्य समन्वयक आहेत,गेली पंचवीस वर्षे ते खोपोली नगर पालिका येथे नगरसेवक असून थेट नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.२००९ साली त्यांनी सेनेत प्रवेश केल्यावर खोपोलीत त्यांनी सेनेचे ११ नगरसेवक निवडून आणले आहेत.ते कर्जत खालापूर मराठा समाजातील वजनदार नेतृत्व आहेत. भाई शिंदे हे खानाव ग्राम पंचायत चे सरपंच ते शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख होते, रायगड जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली असून एक धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. यावेळी या तिघांच्या अनेक सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार महेन्द्र थोरवे यांचे पारडे जड झाले आहे.यावेळी अनेक नगरसेवक,सरपंच,मनसे, विवीध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला.रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाश कोळी, आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, वसंत भोईर,शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, भाजप महीला उपाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप जिल्हा चिटणीस दीपक बेहेरे,सम्पर्क प्रमुख विजय पाटील यांच्या सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.