कोकण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांसाठी खास गाडी काढली गेलीय पण ही साधी गाडी नाही तर नाव आहे थेट शिवसेना एक्सप्रेस आणि ही गाडी सोडण्याचा मान मिळालाय शिवसेना आमदार निलेश राणेंना आता इथूनच सुरू झालाय वाद ही गाडी खरंच प्रवाशांसाठी आहे की मग राजकीय ब्रँडिंगसाठी या गाडीचं उद्घाटन शिवसेना आमदार निलेश राणेंच्या हातून होणार आहे
आता विरोधक लगेच प्रश्न विचारणार ही सरकारी रेल्वे की पक्षाची रेल्वे विशेष म्हणजे राणे घराणं आणि शिवसेना दोघांचा जुना संघर्ष सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे या सोहळ्यातून नवीन वादाला तोंड फुटू शकतं…उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदेही या वेळी उपस्थित राहणार आहेत…म्हणजेच हे फक्त रेल्वे उद्घाटन नाही तर शिवसेना एकजूट दाखवण्याचा मंच बनणार आहे…पण प्रश्न असा प्रवाशांसाठी गाडी आहे की राजकीय शो ऑफ.हो चाकरमान्यांना या गाडीमुळे नक्कीच सोय होणार आहे… शिवसेना एक्सप्रेस हे नाव ठेवून पक्षाने लोकांच्या भावनांना हात घातला का ? म्हणजेच हे फक्त रेल्वे उद्घाटन नाही तर शिवसेना एकजूट दाखवण्याचा मंच बनणार आहे… पण प्रश्न असा प्रवाशांसाठी गाडी आहे की राजकीय फायदासाठी ?