चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम ) :-
कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीतील मतदारांनी एकमुखी पाठिंबा जाहिर केला आहे…कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ कोयना प्रकल्पग्रस्त पाच गाव वडवळ येथील जागृत देवस्थान वाघजाई मंदिरात वाढविला आहे….कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या अनेक समस्या गेली ६५ वर्ष प्रलंबित आहेत…नोकरी,पर्यायी जमीन,प्रकल्पग्रस्त दाखले, नागरी सुविधा, विस्तारित गावठाण, जमीन व गावठाण मोजणी अशा प्रकारच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत…या सोडविण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी प्रामाणिक प्रयत्न देखिल केला नाही…सन १९९९ साली ठाणे जिल्हयातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की,कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचा विषय निघाला तरी माझ्या डोळ्यात पाणी येते.तरीही त्यांनी कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला नाही…कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेन्द्र थोरवे यांनी कोयना प्रकल्पग्रस्त गावांना भेटी देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या…त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या दोन बैठका घेऊन कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या समस्या मांडल्या…त्यानंतर पुर्नवसन सचिव, कोकण आयुक्त,पुणे आयुक्त यांच्याबरोबर दृष प्रणाली माध्यमातुन चर्चा केली, रायगड जिल्हाधिकारी यांच्या सोबत देखिल त्यांनी बैठक आयोजित करून कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला दिलासा दिला आहे…काही प्रलंबीत प्रश्न मार्गी लावले आहेत,तर काही कामांच्या फायली तयार आहेत…माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या नंतर प्रामाणिक काम आमदार महेन्द्र थोरवे यांनी केले आहे…म्हणुन कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या हितासाठी निर्णय घेतल्याने,खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील सर्व पक्षीय जनतेने महेन्द्र थोरवे यांना पाठिंबा जाहिर केला आहे…यावेळी पनवेल,पेण,रोहा येथील कोयना प्रकलपग्रस्त नेते पाठींबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते…