खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरु असतानाच आज पुन्हा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे…भल्या पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात झाल्याचे समजतेय. कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे… यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामधील ८ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजतेय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ पहाटे चार वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलेय.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर पहाटे ४ वाजता एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. खोपोलीजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. जखमीमधील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले आहेत.कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा खोपोलीजवळ अपघात झाला. पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली…या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत…सदर अपघातातील बस व ट्रक ही दोन्ही वाहने आयआरबीकडून हायड्राच्या व पुलरच्या सहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे…महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत कार्य केले.