Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडकर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे वादाच्या भोवऱ्यात... अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला धमकी...

कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे वादाच्या भोवऱ्यात… अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला धमकी…

कर्जत शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचे समोर आले आहे.    कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचा प्रकार रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी उघडकीस आला आहे… या घटनेमुळे कर्जतमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे…कर्जत मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे प्रचार दौऱ्यावर असताना कडाव येथे रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या दरम्यान राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटील हे मोटारसायकल वरून प्रवास करीत होते. यावेळी त्यांना आमदार थोरवे यांनी अडवून दमदाटी करून शिवीगाळ केली. मनोहर पाटील हे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करीत आहेत. दरम्यान, आमदार थोरवे यांच्या या कृतीमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.सध्या कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. कर्जत मध्ये शिवसेना शिंदे गटातून महेंद्र थोरवे, अपक्ष उमेदवार सुधाकर घारे, शिवसेना ठाकरे गटातून नितीन सावंत अशी तिरंगी लढत होत आहे. घर टू घर प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच गावात येणार नाहीत, याची दक्षता पोलीस यंत्रणा घेत आहे. मात्र, तरीही आज झालेल्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने आपापल्या उमेदवाराचा प्रचार करावा असे मनोहर पाटील यांनी यावेळी आमदार थोरवे यांना म्हटल्यावर थोरवे यांनी पुन्हा धमकी देण्यास सुरूवात केल्याचे सबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे…माझ्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला  धमकी देत आमदार थोरवे यांनी त्यांचं स्वतःच भान विसरून अपशब्द वापरणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला जातोय. निवडणूक आयोगाला आणि पोलीस यंत्रणेला महेंद्र थोरवेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय, असे  म्हटले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments