पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
पेण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रचारार्थ खारेपाट वाशी विभागात अतुल म्हात्रे यांनी विभागातल्या बहुतांशी गावांना भेटी देत येथील प्रत्येक गावात जाऊन विविध समस्या जाणून घेतल्या…
गेले अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथला पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही… पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की, हा प्रश्न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहे… पण त्याचबरोबर मी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहेत या रोजगाराच्या समस्येवरती मी काम करणार आहे… या विभागात वाड्या-वस्त्या गावांपासून दूर आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे… शेतावर आणि वाड्यांवर जी घर आहेत इथे अजून देखील गाडी पोहोचत नाही अजून देखील रस्ते झाले नाही पाण्याची कुठली सुविधा नाही तसेच येथील जनता वर्षभर पागोळी, विहिरीतलं पाणी पितात या ज्या काही समस्या आहेत या समस्यांवर कायमचा तोडगा काढून येथील परीसर सुजलाम सुफलाम करणार आसल्याचे अतुल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले… तसेच पेण-सुधागड-रोहा या मतदारसंघातील नागरिकांना स्वच्छ पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी अतुल म्हात्रे यांनी सांगितला… तसेच एक हजार शेतकऱ्यांना बांधकाम व्यावसायिक बनवण्याचा संकल्प असून, बांधकाम क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना आखली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले… पेण तालुक्याचा पूर्व विभाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे या पूर्व विभागात ऍग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना करून स्थानिक स्थानिक तरुणांना रोजगार यानिमित्ताने उपलब्ध होऊ शकतात… तसेच उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करून आरोग्य सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले…
काँग्रेस पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल यांनी पेण तालुका काँग्रेस पक्षाकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांना पाठिंबा असल्याचे जाहिर केले…. अलिबाग आणि पनवेल या मतदार संघामध्येही शेकापच्या उमेदवारांना काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या आदेशाने पाठिंबा असल्याचे जाहिर केले…
यावेळी पेण तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक मोकल, नंदकुमार म्हात्रे, रामशेठ घरत, सूर्यकांत पाटील, वैभव म्हात्रे, शेखर शेळके, इदुल्ला कुवारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते…