म्हसळा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
193 श्रीवर्धन विधानसभा 2024 मतदार संघाकरिता जो मी लढण्याकरिता उतरलो आहे… ते निव्वळ ईश्वराचे नियोजन असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ यांनी म्हसळा शहर येते एका जाहीर आयोजित कार्यक्रमात सोमवार दि.11नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा सभे दरम्यान केले… राजाभाऊ ठाकूर हे 193 श्रीवर्धन मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणुन प्रेमाचे आहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या “लिफाफा” या चिन्हावर आपले नशीब अजमावत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत… सदर कार्यक्रमाच्या वेळेत व्यासपीठावर उमेदवार राजाभाऊ ठाकूर सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे गटातील रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, मंगेश देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा ठाणे जिल्ह्याचे प्रभारी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे संघटक वैभव म्हात्रे (जे अंध आहेत ) रायगड जिल्हा काँग्रेस जिल्हा सचिव डॉ. नरेंद्र सिंग,पदाधिकारी सौ. डाकी , सौ.प्राची आर.ठाकूर, माणगाव ता. काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष विलास सुर्वे, तळा ता. अध्यक्ष शरद भोसले, रोहा ता.अध्यक्ष सुनील देशमुख, अलिबाग ता. अध्यक्षभास्कर चव्हाण, श्रीवर्धन काँग्रेस पदाधीकारी अबरार,म्हसळ्या नगरसेवक सुफियान भाई, नईम भाई, अशफाक भाई, सौ. नाझमा मुकादम, आरती पेढणेकर, माजीद सुभेदार, ऐजाज घरटकर, लहू म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माणगाव ता. पदाधिकारी लहू लुस्थे सह इतर तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांचे सभे ठिकाणी आगमन होताच कार्यकर्ते यांनी आपला मानातील असलेल्या राजा, राजाभाऊ ठाकूर यांचे जंगी स्वागत करून फटाक्यांची अतिशबाजी केली… दरम्यान उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी आपला भाषाणात प्रथम सर्वांचे स्वागत करून जाहीर सभा कार्यक्रमाचे आयोजक यांचे तोंड भरून स्तुती केली.. कारण व्यासपीठावर लावलेल्या सर्व नेते मंडळी यांचे फोटो राजाभाऊ ठाकूर यांना भावले… आणि सर्व थोर लोक नेते यांच्या प्रत्येकाचे देशासाठी आणि विकासासाठी केलेल्या कामाची माहिती उपस्थित लोकांना राजाभाऊंनी विराट कॉर्नर सभेमध्ये दिली…यानंतर उपस्थित जनतेला बोलताना उमेदवार राजाभाऊ ठाकूर म्हणाले की मी आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आल्यास या मतदारसंघाचा विकासाने कायापालट करीन… अशी विकासकामे करीन की पुढच्या निवडणूकच्या वेळेत तुम्ही मला पुन्हा निवडून आणाल.. पुढे विकास कामांबाबत बोलताना ते म्हणाले गेले 15 वर्ष पाहिजे तेवढा विकास या मतदारसंघाचा झाला नाही… मात्र या बाबत अधिक भाष्य न केलेलेच बरे असा टोला त्यांनी हाणला…
राजाभाऊ यांनी पुढे सांगितले की , तीन दिवसापूर्वी अमित शहा यांनी आम्ही जिंकून सत्तेवर आल्यावर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार नाही… असे वक्तव्य केले होते… या मुद्द्याला स्पर्श करीत राजाभाऊ म्हणाले की असे जातीय राजकारण कोणी करू नये… समाजाचे सर्व लोक या देशात समान आहेत…सर्वजण ईश्वराची लेकरे आहेत… त्यामुळे जातीय आणि धार्मिक भेद कोणी करू नयेत… मुस्लिम-हिंदू या सर्वाना समान न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे… ही निव्वळ ईश्वराच्या नियोजनामुळे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणुकीकरिता उभा आहे… त्यांच्या या वाक्यावर लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या… राजाभाऊ पुढे म्हणाले की, येथील मंचावर नेते आणि कार्यकर्ते यांच्या गळ्यात काँग्रेसची निशाणी असलेला पहिला मफलर आहे… आणि अंदरकी बात ये है कि…राहुल गांधी यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत… काही आपलेच लोक जाणूनबुजून माझा बद्दल अपप्रचार करीत आहेत …पण जनता माझ्या बाजूने आहे…संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मला रायगड लोकसभा निवडणुकीकरिता समन्वयक म्हणुन निवडले होते… जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी त्याच बरोबर कार्यकर्ते यांना विचारा की काँग्रेस पक्षाचे कसे काम केले ?आज रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे… आणि आम्ही ही ताकद दाखवून देऊ… स्वर्गीय अंतुले साहेब यांचे आशीर्वादया जिल्ह्याला आहेत… मात्र त्यांच्या आशीर्वादावर मोठे झालेले मुस्ताक अंतुले सांगतात की काँग्रेस पक्षाला रायगडात उमेदवारच नाही… हे दुर्दैव आहे… असे बोलून राजाभाऊंनी भर सभेत वृत्तपत्रातील बातमी झळकवली…मुस्ताक अंतुलेचे वक्तव्य ऐकून बॅरिस्टर अंतुलेनाही स्वर्गात वाईट वाटले असेल आणि म्हणूनच ईश्वराने मला याठिकाणी पाठवले आहे… दरम्यान विविध विषयाला स्पर्श करीत विरोधकांच्या सर्व मुद्द्यांची चिरपाड करीत राजाभाऊ ठाकूर पुढे म्हणाले की मला आपल्या मतांचे दान प्रेमाचे आहेर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पाकीट अर्थातच “लिफाफा” चिन्हावर भरभरून मतदान करा…आणि मला प्रचंड मतांनी विजयी करा…गेली पंधरा वर्ष या विभागात खुंटली असल्याची मिश्किल टिका मंत्री अदिती तटकरे यांचे नाव न घेता केली… उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्या अगोदर वैभव म्हात्रे, चंद्रकांत पाटील, सदानंद येलवे, मंगेश देशमुख, विलास सुर्वे, सुफियान भाई, महिला अध्यक्ष सौं.नाजीमा मुकादम यांचेही तडफदार भाषणे झाली…