Thursday, November 21, 2024
Homeक्राईम न्यूजमतीमंद मुलीवर बहिणीच्या दिराकडून बलात्कार...आरोपीस दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा...

मतीमंद मुलीवर बहिणीच्या दिराकडून बलात्कार…आरोपीस दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा…

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बावीस वर्षीय मतिमंद पिडीतेवर बहिणीच्या दिराने बलात्कार केल्याप्रकरणी दहावर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांनी सुनावली आहे… याबाबत सविस्तर माहिती अशी की,पेण तालुक्यातील एका गावात फिर्यादी महीला हीची बहिण ही बावीस वर्षीय मतिमंद असून तिच्यावर दिराने राहत्या घरी बलात्कार केल्याची घटना दि. २३/०६/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते ६.०० या दरम्यान घडली होती. पीडित महिला ही मतिमंद असून ती बौद्ध समाजाची आहे. याची कल्पना असताना देखील तसेच या प्रकरणातील फिर्यादी व त्यांचा पती हे दोघेजण कामावर गेले असताना पीडित मतिमंद मुलगी ही घरात एकटी असल्याची संधी साधत फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा तिचा सख्खा दिर याने फिर्यादीच्या राहत्या घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन पिडीतेवर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले व अनैसर्गिक संभोग केला. यावर पिडीतेची बहीण हिने पेण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुध्द तक्रार नोंदविली असता, याप्रकरणी सदर केसचा तपास खालापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति.कार्यभार पेण विभाग संजय शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल केले…सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ-पाटील, यांनी एकूण १६ महत्वाचे साक्षीदार तपासले व न्यायालयसमोर स्मिता धुमाळ विशेष सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला…यातील फिर्यादी साक्षीदार,पिडीता मुलगी,वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल शर्मा तसेच विशेष शिक्षिका नैनिता लक्ष्मण पाटील व तपासिक अंमलदार संजय शुक्ला यांची साक्ष महत्वाची ठरली…. तसेच पोलीस हवालदार सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी महीला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर, यांचे सहकार्य मोलाचे ठरले…सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ पाटील यांनी सरकारपक्षातर्फे मा. कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. सदर खटल्यात आरोपी यांच्यावर भा. द. वि. सं. ३७६ (२) एल ३७७, ४५२, ५०४ व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९७९ चे कलम ३ (१) (w) (i), ३ (२) (v) प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यातील आरोपी रमेश रघुनाथ मोकल यास भा. द. वि. सं. ३७६ (२) एल करीता १० वर्षे शिक्षा व रु. १,०००/- दंड तसेच भा. द. वि. सं. ३७७ करीता ५ वर्षे व रु. १०००/- दंड, व भा. द. वि. सं. ५०६ करीता १ वर्षे शिक्षा व रु. ५००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments