रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
शेतकरी कामगार पक्ष हा दिनदुबळा गोरगरीब व बहुजन समाजाला न्याय देणारा पक्ष असून, या पक्षाच्या माध्यमातून मी उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे… या निवडणुकीत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी व माझे सर्व तरुण सहकारी नक्कीच मला भरघोस मतांनी विजयी करतील…असा आशावाद प्रीतम म्हात्रे यांनी मोहोपाडा येथे रविवार दि.१७ नोव्हेंबर रोजी झालेल्या जाहीर प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला…
या जाहीर प्रचार सभेत प्रितमदादा म्हात्रे यांनी आजी-माजी आमदारांवर चांगलाच हल्लाबोल चढवला… प्रीतमदादा म्हणाले की, एच.ओ.सी.कंपनीची जागा बीपीसीएलला दिली… परंतु ही जागा २०१९ पर्यंत दिली नव्हती ही जागा माजी आमदार विवेक पाटील साहेबांमुळेच दिली नव्हती… परंतु आताचे विद्यमान व्यापारी आमदार.. दलाल.. कोण काय काय शब्द उच्चारतो हे आपणास सर्वश्रुत आहे… याच आमदारांनी येथील स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचे काम केले असल्याचा आरोप प्रितम म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला… ते पुढे म्हणाले की, एच.ओ.सी.कंपनीत त्यावेळी जवळपास अडीच ते तीन हजार कामगार होते आणि आता सद्यस्थितीत बीपीसीएलमध्ये केवळ अडीचशे ते तीनशे कामगार आहेत… ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक असल्याचे प्रितम म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले… २०१९ ला विधानसभेची निवडणूक लागली, त्यावेळेस कर्नाळा बँकेचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवली गेली ठेवीदारांचे पैसे बुडाले असा आरोप या मंडळींनी केला परंतु कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचा पैसा व्याजासह परत दिला… शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कष्टकरी दिनदुबळ्या समाजाला न्याय देणारा पक्ष असून, शेतकरी कामगारपक्ष ही कार्यशाळा आहे… आणि याच कार्यशाळेतून नेता कार्यकर्ता घडला जातो… परंतु काही मंडळी पक्ष सोडून गेले… मात्र शे.का.पक्षातील निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता हा सदैव जागृत असतो आणि म्हणूनच अशा नेत्यांना सामान्य कार्यकर्ता त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसत नाही विरोधकांनी अनेक वल्गना केल्या कि, शे.का.पक्ष संपला… परंतु शे.का.पक्षाला संपवणारे स्वतः संपलेत मात्र शेतकरी कामगार पक्ष जिंदा है… और टायगर भी जिंदा है… असे सांगतात उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रितमदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. लाल बावटे की जय… अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला… प्रितम म्हात्रेंची ही प्रचार सभेला रेकॉर्डब्रेक सभा झाल्याचे सर्वत्र चर्चा होती… ही रेकॉर्डब्रेक सभा पाहून प्रितम म्हात्रे यांचा विजय हा निश्चित असल्याचे बोलले जात आहे…
व्यासपीठावर प्रितम शेठ म्हात्रे यांचे पिताश्री पनवेल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, मा.सभापती नारायणशेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते समाज भूषण उत्तमराव गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते महेश साळुंखे, जे.एन.पी.टी.चे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, माजगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पं.तु.पाटील, ज्येष्ठ नेते गोपाल पाटील, माजी सभापती गजानन माळी, जगदीश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राम भोईर, मराठा महासंघाचे संघटन मंत्री विनोद साबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६) उरण विधानसभेचे अध्यक्ष पंकज सोनवळे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष दयानंद सरवदे, ह.भ.प. मारुती पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील सोनावळे, मोहोपाडा वासांबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राकेश खारकर, तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रिया माळी, मनीषा चोरगे, ज्ञानेश्वर मोरे, कार्यकर्ते संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते… गर्दुल्ल्यांना साथ देणारा आमदार आपल्याला नकोच आहे… त्याला गाडल्याशिवाय येथील जनता गप्प बसणार नाही असा घणाघाती आरोप उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील यांनी या प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला… ते पुढे म्हणाले की, जाती जातीत व धर्मा धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम महेश बालदी करत असल्याचा गंभीर आरोप गोपाळ पाटील यांनी यावेळी व्यक्त करत आमदार महेश बालदी व माजी आमदार मनोहर भोईर यांचा खरपूस समाचार घेत चांगलाच हल्लाबोल चढवला… ज्याची ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही तो ओला बोंबील विधानसभा लढवायला निघाला असा थेट आरोप मनोहर भोईर यांच्यावर केला… मनोहर भोईर आणि महेश बालदी हे दोघेही जुगारी असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी व्यक्त करत येथील सुज्ञ मतदार या दोघांना त्यांची जागा दाखवतील यात तीळमात्र शंका नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले प्रीतम शेठ म्हात्रे यांना उरण मधून प्रचंड मताधिक्य मिळणारच परंतु रसायनी खालापूर मधूनही प्रीतम म्हात्रे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय कराल असे आव्हान गोपाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केले… आगरी समाजाच्या नादाला लागाल तर याद राखा असा सज्जड इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्यचिटणीस तथा माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी या प्रचार सभेदरम्यान व्यक्त केला… शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व असलेले प्रितम म्हात्रे हे प्रचंड मताधिक्यांनी विजय होतील असा आत्मविश्वास भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला या प्रचार सभेला ही अलोट गर्दी पाहून प्रीतम म्हात्रेच विजयी होतील असे त्यांनी अधोरेखित केले…
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र अशी रायगड भूमी आणि ही भूमी क्रांतिकारी योद्धांची भूमी असून, शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार सरणीचा पक्ष असल्यामुळे आपल्या उरण विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या शिट्टी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी उपस्थितांना केले… यावेळी उपस्थित मान्यवरांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल करत प्रीतम दादांनाच प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी या जाहीर सभेत मतदार बंधू-भगिनींना केले…