रा.जि.प.शाळा वडगावची मतदान जनजागृतीसाठी फ्लॅशमॉब संकल्पना रुजवून जनजागृती…
चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव यांनी मतदान जनजागृतीसाठी फ्लॅशमॉब ही संकल्पना रुजऊन जनजागृती केली… ही अफलातून जनजागृती पाहण्यासाठी गटशिक्षणाधिकारी चोरमले व केंद्रप्रमुख नंदा मोहिते यांची उपस्थिती होती…
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यात प्रथम आलेली मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा वडगाव शाळा नेहमीच अफलातून उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या वडगाव शाळेने संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत अष्टविनायक पैकी महडच्या मंदिरासमोर भाविक भक्तांच्या रांगेत फ्लॅशमॉब करत मतदान जनजागृती केली… यावेळी यश तानाजी पाटील या विद्यार्थ्याने लोकशाहीसाठी मतदान करा, असे आवाहन करत लोकांना चला मतदान करूया! वोटींग प्लिज अशा पत्रकाचे वाटप केले… तसेच केंद्रप्रमुख नंदा मोहिते यांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात चला करू मतदान… मतदान मतदान या गीतावर नृत्य सादर केले… खालापूर बसस्थानकावर गट शिक्षण अधिकारी कैलास चोरामले यांच्या उपस्थितीत गीत सादरीकरण करत मतदान करा अशी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगावकडून पत्र वाटप करण्यात आले… यावेळी उपस्थित भाविक, प्रवासी व बसच्या चालक व वाहक व प्रवासी यांनी सुद्धा ठेका धरला… रायगड जिल्हा परिषद शाळा वडगावच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे… या उपक्रमासाठी स्विप समिती प्रमुख कैलास चोरामले, नोडल अधिकारी नंदा मोहिते यांनी मार्गदर्शन केले तर समिती सदस्य सुभाष राठोड सहउपशिक्षक वैजनाथ जाधव, स्वयंसेविका साक्षी, आकांक्षा, वेदिका व भाग्यश्री यांनी सहकार्य केले… वरदविनायक ट्रस्ट महड यांनी सुद्धा मुलांचे कौतुक व सहकार्य केले…
मतदान शंभर टक्के व्हावे म्हणून वडगाव शाळेने फ्लॅशमॉब ज्यापद्धतीने उपक्रम राबविला खूपच नाविन्यपूर्ण आहे… कैलास चोरामले, गटशिक्षणाधिकारी खालापूर राठोड व संपूर्ण टीम उत्तम कार्य करत असून ही फ्लॅशमॉब ची आयडिया अफलातून होती, असे केंद्रप्रमुख नंदा मोहिते यांनी सांगितले… जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि आज चतुर्थी असल्याने महड येथे भावीक येतात याचे औचित्य साधून फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते… सर्व अधिकारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले, असे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी सांगितले…