देयकाची उर्वरित रक्कम देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना दोन कर्मचारी सहित खासगी ठेकेदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

0
7

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

शासकीय कार्यालयातील काम झटपट व्हावे यासाठी कार्यालयातील शासकीय कर्मचारी अथवा त्या कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या इसमाद्वारे टेबलाखालून काही ठराविक रक्कम याची मागणी ही संबंधितांकडे केली जाते. काहीवेळा संबंधित हे मागितलेली मागणी देण्यास असमर्थ असणारा इसम हा आपले काम होत आहे म्हणून मागणी करण्यात आलेल्या रक्कमेत तडजोड करीत आपले काम साधून घेतो… तर कही जण यांच्या वागण्याला कंटाळून त्यांना धडा शिकविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतात…रक्कम मागणाऱ्या इसमावर रक्कम देण्याचा बहाणा करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई घडून आणतो… अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरातील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात असणाऱ्या वित्त विभाग कार्यालयात घडली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत वित्त विभागातील दोन कर्मचारी यांच्यासहित ठेकेदार असलेला एक खासगी इसम यास पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रायगड जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतल्याने रायगड जिल्हा परिषद ही परत एकदा सणासुदीच्या काळात चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये अर्थ विभागात मुख्य लेखापाल यांच्यावर लाच प्रकरणी कारवाई करण्यात आलेली घटना पुन्हा चर्चेत आली होती.

रायगड जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात कारवाई करीत आरोपी लोकसेवक आशिष मदन कांबळे, (वय ३६ वर्ष, कनिष्ठ सहाय्यक लेखा, वित्त विभाग वर्ग- 3 नेमणूक:- जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग ता.अलिबाग जि. रायगड), दिलीप रामचंद्र कावजी, (वय५६ वर्ष, पद :- शिपाई, वर्ग 4, वित्त विभाग, जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग ता. अलिबाग जि. रायगड) यांच्या सहित खाजगी इसम विलास भिकाजी ढेबे, (वय२९ वर्ष, पद – खाजगी ठेकेदार) यास दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे…

रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील मोजे: शेणे गावात केंद्र शासनाची जल जीवन मिशन या योजने अंतर्गत सन २०२२-२०२३ साली वडखळ येथील एम.एस.एस कंस्ट्रक्शन या ठेकेदारास मिळाले होते… सदरचे काम करण्यास त्याना वेळ नसल्याने या कामा संदर्भात लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया व इतर कामकाज करण्याचे अधिकार पत्र तक्रारदार (पुरुष ३१ वर्ष) याना देण्यात आले होते… त्या अनुषंगाने संबंधित पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईल त्यानुसार एम.एस.एस कंस्ट्रक्शन याना मंजूर निधी पैकी देयक देण्यात आले होते…

सदरचे काम दि. १५ जुलै २०२५ रोजी पूर्ण करण्यात आले होते… त्यानुसार उर्वरित ६९ लाख रुपयाचे देयक मंजूर करून घेण्या साठी तक्रारदार यांनी वारंवार जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे पाठपुरावा केला होता  दिनाक २२ ऑगस्ट २०२५ रोजी उर्वरीत ६९ लाख रुपयाचे बिल मंजुर करून घेण्यासाठी लोकसेवक शिपाई दिलीप रामचंद्र कावजी यांनी ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली असून तडजोडी अंती २५ हजार रुपये लाचेची रक्कम सापळा कारवाई दरम्यान स्वीकारली व स्वीकारून लाचेची रक्कम कार्यालयातील त्यांचे सहकारी आशिष कांबळे, कनिष्ठ सहाय्यक लेखा व वित्त विभाग यांच्याकडे दिली असता त्यांनी ती लाचेची रक्कम खाजगी इसम विलास भिकाजी ढेबे यांच्याकडे सुपूर्त केली… त्यामुळे सदर सापळा कारवाई मध्ये दोन लोकसेवक व एक खाजगी इसम यांना लाचेच्या रक्कमे सह ताब्यात घेण्यात आले आहे… याबाबत रात्री उशिरा पर्यंत अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती…