Thursday, November 21, 2024
Homeअपघातमध्यरात्री तीन वाजता बस २० फूट खड्यात कोसळली... चालकाचा ताबा सुटल्याने बस...

मध्यरात्री तीन वाजता बस २० फूट खड्यात कोसळली… चालकाचा ताबा सुटल्याने बस खड्ड्यात उलटली…

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे… मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली…मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरून कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला आहे, या अपघातानंतर खाजगी बस 20 फूट खड्ड्यात कोसळली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने मागून धडक दिली, त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मार्ग सोडून खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या भीषण अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र बसमधील अकरा प्रवासी यात जखमी झाले आहेत…मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे…संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले…या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे…घटनास्थळी आयआरबी देवदूत पथक ,खोपोली अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम आणि महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी बस मधील अडकलेल्या बस चालकांसह प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढलं. बस प्रवासी यांच नशीब बलवत्तर म्हणून की काय मोठी हानी टळली. खंडाळा घाटात अनेक ठिकाणी खोल दरी आहेत मात्र हा अपघात जिथं झाला तिथं 20 ते 25 फुटाचा खड्डा असल्याने बस थेट तिथेच जाऊन पलटी झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments