चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
माणसाच्या आयुष्यातील माया निघून गेली की, तिथे बोधाचा जन्म होतो, त्यामुळेच माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो, असे पारमार्थिक विचार ज्येष्ठ कीर्तनकार हभप. संदिप महाराज यादव यांनी केले… श्री.भागवत धर्माचार वारकरी सांप्रदाय सामुदायिक मंडळ पालखी सोहळा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे यांच्या पायी आळंदी वारीचे १०१ वे वर्ष. असून, ही पायी वारी गेली १०१ वर्ष खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी येथील काईनकर परिवारात एक दिवसाच्या मुक्कामाला येते… त्यानिमित्ताने भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता… यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार हभप.संदिप महाराज यादव बोलत होते… ते पुढें म्हणाले माणसाच्या जीवनात सोळा अपत्य असून, त्यात दहा मुले आणि सहा मुली जन्माला आल्या आहेत… काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, मी, तू, माझं, तुझं ही दहा मुले तर आशा, मनसा, तृष्णा, ईच्छा, तृप्ती, कामना या सहा मुली जन्माला आल्या आहेत… भक्ती, ज्ञान आणि संगोपन हे कधीच कुणाबद्दल वाईट बोलत नाहीत… ज्ञान आत्मसात करून आत मध्य येते त्यावेळी माया निघून जाते, म्हणून माया आहे तोपर्यंत बोध होत नाही… माया ही माणसाला शांत बसून देत नाही. या कार्यक्रमाला भिवंडी, ठाणे, कल्याण तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक वारकरी सांप्रदाय उपस्थित होता… हभप कमलाकर काईनकर, हभप रमेश महाडिक, हभप अरुण दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते…