सुनील तटकरे हे कुत्र्याचे शेपूट,वाकडेच राहणार…थोरवेंचा स्फोटक हल्ला… शिंदेच्या आमदाराने सगळं काढलं,महायुतीतला वाद चव्हाट्यावर…

0
2

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. कळंब जिल्हा परिषद गटातील सरपंच हरिश्चंद्र निरगुडा आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

यावेळी थोरवे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, राज्यात महायुतीची सत्ता असतानाही रायगडमध्ये राष्ट्रवादी खोटे राजकारण करत आहे. “तटकरे हे कुत्र्याचे शेपूट आहेत, वाकडेच राहणार, असा थोरवे यांचा थेट टोला होता.त्यांनी सांगितले की, तटकरे विधानसभेतही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत होते आणि आता स्थानिक निवडणुकीतही तशीच कुटनिती करत आहेत.दरम्यान, रायगडमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव गट) युती होणार असल्याच्या चर्चांनंतर तटकरे यांनी ती फेटाळून लावली. पण थोरवे यांनी याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

थोरवे म्हणाले की, महायुती एकजुटीने लढणार असून कोणत्याही भ्रमात पडू नये. तटकरे आणि त्यांचे कार्यकर्ते राजकीय खेळ खेळत असले तरी महायुती त्याला उत्तर देईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या घडामोडींमुळे रायगडमधील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महायुतीने एकजुटीने लढा दिला, तर त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक निवडणुकीवर होईल. रायगडमधील हा संघर्ष आता निवडणुकीच्या रणांगणात अधिक रंगत आणणार आहे.