Monday, November 25, 2024
Homeमुंबई / नवी मुंबईराज्यातील जनतेने मतदान केले की ईव्हीएम मशीनने...ईव्हीएममधील गडबडीची महाराष्ट्र सर्वत्र चर्चा...

राज्यातील जनतेने मतदान केले की ईव्हीएम मशीनने…ईव्हीएममधील गडबडीची महाराष्ट्र सर्वत्र चर्चा…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खुद्द भाजपलाही लाजवेल अशा मिळालेल्या यशानंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ईव्हीएमचा मुद्दा चर्चेला आला आहे…महाविकासाची लाट असताना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी घेऊनही विधानसभेत महाविकासला जेमतेम पन्नाशी गाठता येणं, हा अविश्वसनीय निकाल असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र बोलत आहे. यााबाबत अनेक दिग्गज, ज्येष्ठ नेत्यांची प्रश्न उपस्थित केल्याने कार्यकर्त्यांनी ईव्हीएमचा विजय असो… अशी घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले…अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि महाविकासमध्ये दोन्ही पक्षांमध्ये कांटे की टक्कर होईल, असे चित्र होते. मात्र, चित्र बदलत गेले आणि काही वेळातच भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करेल असे चित्र निर्माण झाले. त्यानंतर ईव्हीएममधील गडबडीची चर्चा मतमोजणी केंद्रात सुरू असल्याचे पहायला मिळाले…लोकसभेसारखेच विधानसभेतही राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असताना कालचा लागलेला निकाल अनपेक्षित म्हणावा लागेल…राज्यातील जनतेने मतदान केले की ईव्हीएमने, असाही संशय महाविकास आघाडीच्या नेत्यांककडून व्यक्त केला जात आहे. कारण, मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान आणि त्यानंतर मतदानाचा झालेला वर्षाव हाही चिंतनाचा विषय आहे. तसेच, लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात निवडणूक आयोगाने दाखविलेली तत्परता विधानसभेवेळी दिसून आलेली नाही…मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत प्रशासन आकडेवारी जाहीर करीत होते…त्यामुळे ईव्हीएममधील चलाखीचा संशय विरोधकांकडून व्यक्त होतोय…दरम्यान, आजच्या निकालानुसार राज्यात पुढील पाच वर्षे महायुतीचे सरकार राहणार असून, महाविकास आघाडीला विरोधक म्हणून जोरदार कामगिरी करावी लागेल…
भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवले आहे…भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 53 जागांवर यश मिळाले आहे…अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचेही 40 आमदार निवडून आले आहेत…तर महाविकास आघाडीला 55 जागा मिळाल्या असून, त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट 22, काँग्रेस 16, शरद पवार गट 12 जागांचा समावेश आहे.
दरम्यान, निकालाबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही ज्या प्रचारसभा घेतल्या, हा निकाल म्हणजे अनाकलनीय आहे. लोकांनी महायुतीला मते का की, नेमकी दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून, महिलांना सुरक्षितता नाहीय म्हणून दिली कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे कळत नाहीय. हा निकाल अनाकलनीय आहे, यामागचे गुपित शोधावे लागेल. आपण निराश होऊ नका. खचून जाऊ नका. हा ईव्हीएमचा विजय असू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही वचन देतो की,आम्ही लढत राहू…
दरम्यान, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे मतदान महाराष्ट्राने केले आहे की ईव्हीएमने केले आहे हा प्रश्नच आहे. यावर आम्ही चर्चा करूच. लोकसभेत महाराष्ट्राने आम्हाला आशीर्वाद दिला होता. पण विधानसभेत तो आम्हाला मिळाला नाही याचा आम्ही जरूर विचार करू, असे असले तरी यात ईव्हीएम किती प्रचार केला याचाही विचार करू लागलेला निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता. यातील तांत्रिक गोष्टींवर आम्ही चर्चा करू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच पुन्हा जिंकू, असेही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments