५ हजार कोटींचा भूखंड बिवलकरांना; भूमिपुत्रांचा हक्क बुडाला?… सिडकोचा भूखंड घोटाळा उघड महाविकास आघाडीचे निवेदन…

0
1

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबईत सिडकोचा मोठा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. १२.५ टक्के योजनेअंतर्गत भूमिपुत्रांच्या घरांसाठी राखीव असलेला तब्बल १५ एकरचा, जवळपास ५ हजार कोटी रुपये किंमतीचा भूखंड बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडी व स्थानिक भूमिपुत्रांनी केला आहे.

आज आघाडीच्या नेत्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हा निर्णय म्हणजे भूमिपुत्रांच्या घशात हात घालण्यासारखा आहे. सिडकोने घेतलेला हा बेकायदा निर्णय तातडीने रद्द केला नाही तर रस्त्यावर उतरणारच, असा इशारा यावेळी देण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच बळकावलेल्या वनजमिनी परत घेण्याचा आदेश दिला आहे.तरीसुद्धा सिडकोने घेतलेला हा निर्णय न्यायालयाच्या भावनेलाही धक्का देणारा असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही महत्त्वाची कागदपत्रे पुढील काही दिवसांत मिळणार असून त्यानंतर आंदोलनाची दिशा व पुढची रणनिती ठरवली जाणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे ,आमदार रोहित पवार , प्रवक्ते महेश तपासे, रविकांत वरपे, प्रदेश उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर, मा. बाळाराम पाटील, प्रदेश सरचिटणीस (युवक) सौरभ काळे, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब, राज्य संघटक अवदेश शुक्लाजी, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, शहर प्रमुख यतीन देशमुख, मा. आ. सुधाकर भालेराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कोकण विभागीय अध्यक्ष प्रमोद बागल, युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे, उरण विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, युवक अध्यक्ष शहबाज पटेल आणि प्रदेश सरचिटणीस रेहमान सय्यद उपस्थित होते…