Sunday, November 24, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडपराभूत झाला तरी...संपूर्ण ताकदीने नडला...शेतकरी कामगार पक्षाने ८८ हजारांचा आकडा पार केला...

पराभूत झाला तरी…संपूर्ण ताकदीने नडला…शेतकरी कामगार पक्षाने ८८ हजारांचा आकडा पार केला…

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

उरण 190 विधानसभेत शेकाप आघाडीची  2019 मध्ये 60,000 + मते असताना, चार महिन्यातच जोरदार उरण मध्ये मुसंडी मारून एकट्या शेतकरी कामगार पक्षाचा 88,000 चा आकडा प्रितमदादांनी पार केला…प्रितमदादांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेतल्या. शिवसेनेने मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांची सभा घेतली. स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता  कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना शेकाप नेते श्री. जे एम म्हात्रे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्रितमदादांच्या सोबतीने एकटाच लढला….प्रीतम म्हात्रेंच्या सोबत दुसऱ्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचण्यात मग्न होती…वातावरण विरोधी असताना सुद्धा त्यांनी लढण्याचे ठरवले आणि निसटता पराभव त्यांना पत्करावा लागला. हार न मानता पुन्हा दुसऱ्याच दिवशी आपल्यावर ज्या 88,000 मतदारांनी विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी त्याच सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन दादांनी पुन्हा जोमाने काम करण्याचे ठरवून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे…यावरून भविष्यात प्रितम जनार्दन म्हात्रे हे उरण विधानसभा क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या इतर निवडणुकीत इतर पक्षांना त्यांची जागा दाखवणार असे सांगण्यात येते…महाविकास आघाडीतील सर्व पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या विरुद्ध असताना सुद्धा युवा कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही पक्षाची मते 88,000 पर्यंत नेली…यापुढे उरणमध्ये तरुणांच्या रोजगाराच्या बाबतीत खूप काम करायचे आहे…बेरोजगारी, महिला सक्षमीकरण यांवर मला मुखत्वेपणे मोठे काम करायचे आहे. माझ्यासोबत असलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांना यापुढेही संपूर्णपणे ताकद देण्यासाठी मी योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईनच…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments