ठाकरे ब्रँडचा संपूर्ण पराभव… कामगार पॅनेलने उडवला 9 वर्षांच्या सेनेच्या वर्चस्वाचा डाव… 

0
59

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

मुंबई–बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला संपूर्ण पराभव पत्करावा लागला.मनसे-ठाकरे गटाचा ‘उत्कर्ष पॅनेल’ एकही जागा जिंकू शकला नाही, आणि 21 जागांसाठी झालेल्या मतदानात त्यांचा प्रभाव शून्य ठरला.तर ठाकरे ब्रँड का हरला? याची कारणे अगदी स्पष्ट आहेत…

1. एकत्रीकरण फक्त नावापुरते ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन ‘उत्कर्ष पॅनेल’ तयार केला, पण प्रभावी रणनिती आणि grassroots काम नाही. फक्त ब्रँड नावावर विश्वास ठेवून प्रचार केला, पण जनतेने कामावर जोर दिला आणि भावनिक प्रचाराला नकार दिला.
2. ठाकरे यांचं वर्चस्व आणि गेली 9 वर्ष सत्ता – गेल्या काही वर्षांपासून मनसे-ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीवर सत्ता पकडली होती, पण त्या ठिकाणी काही मूलभूत काम झाली नाही. विकास, मूलभूत सुविधा आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यात अपयश दिसले.
3. शशांक राव यांचे ठोस काम – शशांक राव यांनी कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक काम केली, कामगारांची एकजूट केली, आणि त्यांच्या हितासाठी कार्य केले. त्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्या पॅनेलकडे गेला.
4. ब्रँडवर जास्त भर, कामावर कमी – प्रचार जोरात केला, पण रिअल ऑन ग्राउंड काम, कागदपत्रांची सोय, मतदानादरम्यान जनतेशी संवाद यावर लक्ष दिले नाही.
5. राजकीय संदेश खाली पोहचला नाही – मनसे-ठाकरे गटाच्या पॅनेलने जनता समोर आपला मुद्दा प्रभावी पद्धतीने मांडला नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास हरला.

ठाकरे ब्रँड हरला कारण, त्यांनी फक्त ब्रँडवर विश्वास ठेवला, कामावर नाही. शशांक राव यांच्या कामगार पॅनेलने ठोस काम, जनतेशी संपर्क आणि कामगारांच्या हितासाठी प्रयत्न केले, आणि त्यामुळे विजय मिळवला. आता मनसे-ठाकरे गटाला राजकीय रणनितीत मोठा विचार करावा लागेल, नाहीतर पुढील निवडणुकाही हाच निकाला येईल.