तक्का येथील उड्डाणपुलावर चालत्या गाडीने अचानक घेतला पेट…

0
69

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 

कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या एका गाडीने पनवेलजवळील तक्का येथील उड्डाणपुलावर अचानकपणे पेट घेतल्याने काही क्षणातच ही गाडी आगीत भस्मसात झाली…सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले आहेत…कामोठे येथून अलिबाग येथील आपल्या घरी राणे व त्यांचे सहकारी हे आज सायंकाळी जात असताना अचानकपणे तक्का येथील उड्डाणपुलावर गाडीमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने त्यांनी गाडी बाजूला घेतली व ते गाडी बाहेर येवून आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना गाडीने अचानकपणे पेट घेतला व काही वेळातच ही गाडी आगीत भस्मसात झाली…या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे…