ब्रेकिंग न्यूज…महाराष्ट्रातही भाजपचे धक्कातंत्र…फडणवीस ऐवजी भाजप देणार नवा चेहरा …

0
103

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांसाठी धक्कादायक असा आहे…सध्या महायुतीचे २२५ जागांवर तर महाविकास आघाडी 55 जागांवर वर्चस्व आहे…अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागी निवडून आले आहेत… चित्र पुरेसे स्पष्ट आहे…15 व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे…अर्थातच, आता सर्वांत मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो मुख्यमंत्रिपदाचा…महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार आणि कोण उपमुख्यमंत्रिपदी राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्रिपद सोडणार का? देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सत्ता सोपवली जाणार की भाजप आपल्या पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला पुढे करणार?काहीतरी वेगळा धक्का म्हणून विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील एका बड्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न सुरु आहे…या बड्या नेत्याचे नाव खासदार मुरलीधर मोहोळ असल्याची चर्चा आहे…मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नेमकं कोण आहे आणि कुणाच्या हातात मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, याचा हा धांडोळा सुटता सुटत नाही आहे… त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपा धक्कातंत्राचा अवलंब करणार असे बोलले जात आहे…कारण १० वर्षांपूर्वी देखील भाजपने महारष्ट्रात अशाच धक्कातंत्राची मालिका सुरु केली होती…आता त्याचीच पुनरावृत्ती होणार की काय ? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे…