बळीराज सेनेचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांचे निधन… श्रीवर्धन मतदारसंघातून लढवली होती निवडणूक…

0
94

 श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (प्रथमेश बारे):-

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून बळीराज सेनेतर्फे निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार कृष्णा कोबनाक यांचे रविवार दि. १ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले… हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.. कृष्णा कोबनाक हे दक्षिण रायगडातील हसमुख,उमदे ,सर्वसमावेशक राजकीय नेतृत्व होते… त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वत्र पसरताच रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली… संपूर्ण रायगड जिल्हा हादरला…कृष्णा कोबनाक यांनी नुकतीच बळीराज सेनेतर्फे श्रीवर्धन मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती… या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला… विधानसभा निवडणूक होऊन १५ दिवस होत नाहीत…त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याने कार्यकर्ते,समर्थक दुःखात बुडाले आहेत… कृष्णा कोबनाक यांनी यापूर्वी उबाठा शिवसेना,भाजपा आदी राजकीय पक्षात मोठ्या पदावर काम केले होते…सध्या ते बळीराज सेनेचे काम करत होते…