थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले रायगडमध्ये…रायगड जिल्ह्याचा पारा गेला १६ ते १७ अंशांवर…

0
103

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर ) :-
रायगड जिल्ह्याचा पारा १६ ते १७ अंशांवर आला असल्याने रायगड गारठला आहे… रायगडात हुडहुडी भरली असताना पर्यटकांची पावले थंडीचा आनंद लुटण्यासाठी रायगडकडे वळली आहेत… जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत… रायगड हा पर्यटन जिल्हा आहे… उन्हाळी, पावसाळी पर्यटन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असते… आता हिवाळी पर्यटनही बहरत आहे… दिवाळीनंतर थंडीचा हंगाम सुरू होतो… ऑक्टोबर महिन्यात थंडीने पाठ फिरवली होती… आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटाला जिल्हा गारठला आहे… या थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले रायगडकडे वळू लागली आहेत…