महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड प्रतिनिधी प्रहार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दुपारी बारा वाजता महाड तहसील कार्यालयाचे तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते… यावेळी प्रथम दीप प्रज्वलन करून मुक्तांगण शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली… यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाड लायन्स क्लब अध्यक्षा डॉक्टर मंजुषा कुद्रमुती समाजसेवक बाबूलाल जैन महाड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील, नगरपालिकेचे दीपक महाडिक, महाड पंचायत समितीचे सहाय्यक, गटविकास अधिकारी नामदेव कटरे, महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैजहुर्जूक आदि दिव्यांग अपंग बंधू-भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते… या कार्यक्रमात महानगर परिषदेच्या वतीने अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधीचे वाटप करण्यात आले… आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.फैज हुजुक यांनी महानगर परिषदेच्या वतीने अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने श्री.दीपक महाडिक यांचे आभार मानले त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायत पैकी काही ग्रामपंचायती अपंग निधीचे वाटप करत नाही, असे त्यांनी उपस्थित पाहुण्यांसमोर विषय उपस्थित केला… यावेळी सर्व पाहुण्यांनी अपंग दिनाविषयी आपले विचार मांडले… श्री.नामदेव कटरे यांनी महाड तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक अपंग बांधवांना अपंग निधीचे वाटप करण्यात येईल व तालुक्यातील 134 ग्रामपंचायत पैकी ज्या ग्रामपंचायती अपंग निधीचे वाटप करत नाही त्यांना आमच्या वतीने आदेश देण्याचे सांगितले… यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेश इथले यांनी आजचा कार्यक्रम हा बहुसंख्येने होत असल्याचे सर्व अपंग बंधूंचे आभार मानून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपंग दिनाचे औचित्य साधून प्रत्येक निधीचे वाटप आणि प्रत्येक शासनाच्या योजना हे अपंग बंधूंना कशा घ्याव्यात असे त्यांनी सांगितले… महाड शहर पोलीस स्टेशनचे संदीप पाटील यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाविषयी भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून आपणास अपंग कोण म्हणेल आपण तर सदृढ आणि निश्चय व्यक्ती दिसता आजचा कार्यक्रम हा सर्वांचा आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले… या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.इकबाल देशमुख यांनी केले…