देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार… एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही…गुलदस्त्यात…

0
97

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे…भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत…महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसांसोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची माहिती समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोललं जात आहे. यात राष्ट्रवादीचे 8 नेते, शिवसेना शिंदे गटातील 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. यानुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्‍यांसह ३३ जणांचा समावेश असेल, असे म्हटलं जात आहे.