खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकार कट्टर पंथीयाकडून आत्याचाराच्या घटनेने व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारित होत असल्यामुळे भारत देशात या घटनेने तीव्र निषेधाचे पडसाद उमटत आहेत…अल्पसंख्याकांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत…महिलांवर अत्याचार होत आहेत…या घटना त्वरित थांबविण्यासाठी मानवाधिकार व केंद्र सरकारने तत्काळ दखल घेऊन येथील हिंदुना व अल्पसंख्याकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी खालापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने खालापूर पोलीस स्टेशन बाहेर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती… यावेळी सकल हिंदू समाजाने स्वाक्षरी मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बांगला देशामधील घटनेचा तीव्र निषेध केला… तसेच नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले… यावेळी रुपेश मेस्त्री, संदीप गोसावी, सचिन कुडपाणे, रुपेश लबडे, अतुल कोठारी, गौरव तटकरे, संतोष गंडेरवार, भाजपा खालापूर पूर्व प्रभारी तालुका अध्यक्ष सनी यादव, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष आश्र्विनिताई पाटील, भाजपा खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका नागेश पाटील, भाजपा खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप, भाजपा खोपोली शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, आबा देशमुख, विशाल रसाळ, जगदीश आगिवले, हेमंत नांदे, सुनील नांदे, राहुल जाधव, रवींद्र मोरे, जयेंद्र पाटील, राखी गणेशकर, स्नेहल सावंत, रसिका शेटे, आश्र्विनी आत्रे, योगेश जाधव, बाळू जाधव, अमीर पारठे, शिवलिंग वाघरे आदी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते…