नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
आजचा दिवस फक्त झेंड्याला सलाम करण्याचा नाही.आजचा दिवस आहे आपल्या शूरवीरांचा, जे आपल्या हक्कांसाठी प्राणांची पर्वा न करता झुंज दिली.आणि अशाच शूरवीरांपैकी एक आहेत दि. बा. पाटील.
दि. बा.पाटील फक्त नेते नव्हते;ते शेतकऱ्यांचे खरे रक्षक होते.जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको प्रकल्पामुळे हडपल्या जात होत्या,तेव्हा दि.बा.पाटील शेतकऱ्यांसाठी समोर उभे राहिले. त्यांनी पोलिसांच्या गोळीबाराचा सामना केला, हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी न थकणारी झुंज दिली.
आगरी-कोळी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. अनिष्ट चालीरीतींविरोधात आवाज उठवला,समाजात जागृती निर्माण केली,आणि आपल्या समाजाच्या हक्कांसाठी नेहमी लढा दिला.त्यांच्या नेतृत्वाने समाजाला विश्वास आणि दिशा दिली.
आज आपण फक्त झेंड्याला सलाम करत नाही;आज आपण दि. बा. पाटील यांच्या आदर्शाला सलाम करतो.त्यांच्या संघर्षाने,निडर नेतृत्वाने आणि समर्पणाने आपल्याला शिकवले की सत्य, धैर्य आणि जनतेसाठी सेवा कशी करावी.१५ ऑगस्टच्या पवित्र दिवशी,आपण ठरवतो–त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपल्याही जीवनात सत्य,धैर्य आणि जनतेसाठी न थकणारी सेवा अमलात आणायची.