माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
विघवली (ता. माणगाव) येथील मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचे कार्यकर्ते सुधीर सापळे यांनी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) पूर्ण होण्यास तब्बल 18 वर्षांचा विलंब होत असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी “पायी मार्ग” जाणाऱ्या युवक चैतन्य पाटील यांचे मनापासून स्वागत केले.राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा कामाचा सातत्याने पाठपुरावा करत राहणारे आणि त्याबाबत सामाजिक माध्यमांवर वाहतूक कोंडी, अपघात (लहान-मोठे), मृत्यू, अपूर्ण टप्पे, खड्डे व रखडलेले काम अशा विविध मुद्द्यांवर नियमितपणे माहिती देणारे सापळे हे या विषयावरील सजग आवाज म्हणून ओळखले जातात. पनवेलच्या फळसपे फाट्यावरून महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी आणि स्थिती जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या या पायी प्रवासाची माहिती मिळताच बुधवारी संध्याकाळी सापळे यांनी विघवली गावातील मुंबई–गोवा महामार्गावर चैतन्य पाटील यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन आणि शुभेच्छा व्यक्त करून त्यांचे स्वागत करण्यात आले. “हे दीर्घकाळ प्रलंबित काम संबंधित विभागाने तातडीने पूर्ण करावे. अपूर्णतेमुळे या महामार्गाची वाईट ख्याती झाली असून, अनेक अपघात व जीवितहानी घडली आहे. फक्त दोन महिन्यांपूर्वी आमच्या गावातील एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला,असे सापळे यांनी सांगितले व पुढे बोलताना….