मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी… दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा…

0
2

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आज मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली… दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रवासी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला… मिळालेल्या माहितीनुसार,माणगाव बाजारपेठ परिसरात सकाळपासून वाहतूक ठप्प झाली असून, तब्बल एक ते दोन तासांपर्यंत प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडले आहेत… सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे आणि काही दिवसांत सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहनांची गर्दी लक्षणीय वाढली आहे… मुंबई-गोवा महामार्गावरील काम रखडल्याने आणि बाजारपेठेत वाहतुकीची अरुंद व्यवस्था असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.अनेक वाहनधारकांची पावसामुळे गर्दीत अडकून झालेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे… दरम्यान,वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत… वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहनांची गती सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत… प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे…