सेंट विल्फ्रेड हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साही व जल्लोषात संपन्न…

0
84

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील नामवंत असलेल्या सेंट वेल्फ्रेड हायस्कूल व जुनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन अवरनिया २०२४ मोठ्या उत्साही वातावरणात येथील जी. डी.बधाया सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अतुल्य भारत हा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. या वार्षिक स्नेहसंमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला. पहिले सत्र सकाळी १०ते दुपारी १आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत होते. पहिल्या सत्रा मध्ये ६वी ते ११वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचा अविष्कार दाखवला तर दुसऱ्या सत्रामध्ये नर्सरी ते इयत्ता ५वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपली कलाकौशल्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली… कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.स्वाती राजेश येवले व प्रमुख पाहुणे व सर्व समन्वयक यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रा मध्ये नवी मुंबईच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.उत्कर्षा गीरी,रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद हंबिर,श्री.अलोक शर्मा (सदस्य व्यवस्थापन समिती सेंट विल्फ्रेड फाउंडेशन)श्री.मुकेश सोनी ( CEO CSMU, सेंट विल्फ्रेड), श्रीमती डॉ.मंजुळा वेणुगोपाल (COO सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी) डॉ.साईमा मॅडम (प्राचार्य ACS) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर दुसऱ्या सत्रात रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,पनवेल पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती निशा वैदू उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.मान्यवरांच्या प्रमुख मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक वर्गाला प्रेरणा मिळाली… विद्यार्थ्यांनी नृत्य,संगीत आणि इतर विविध कला गुण सादर करून साऱ्यांचीच मनी जिंकली.कलागुणांचे प्रदर्शन हे सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.मनोरंजन नव्हे तर अविश्वसनीय भारताच्या विविध सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. दरम्यान मुख्याध्यापिका सौ स्वाती राजेश येवले यांनी शाळेचा २०२४-२५ चा वार्षिक अहवाल सादर करुन त्यांनी शाळेच्या प्रगतीची माहिती दिली प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासावर भर देण्याचे काम व्यवस्थापन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्राचार्य येवले पुढे म्हणाल्या की,वार्षिक स्नहसंमेलन सोहळा आमच्या विद्यार्थ्यांसाठी कलागुणांची एक पर्वणीय संधी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले…वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पालकांना आणि स्थानिक समुदायाला शाळेच्या उत्सवात सक्रियपणे सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली… शेवटी,सेंट विल्फ्रेड हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शेडुंग येथे वार्षिक दिवस, ‘अवरनिया’ उत्सव, शैक्षणिक वर्षातील यश साजरे करण्यासाठी विद्यार्थी,पालक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला…