रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी च्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतह नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेणसे सिद्धार्थ नगर लगतज सुरू असलेल्या कामकाजा विरोधात बेणसे सिद्धार्थ नगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आपली शेतजमीन वाचविण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली आहे. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी बुधवारी
दि.(11) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. बेणसे सिद्धार्थ नगर येथे होत असलेल्या या आंदोलनाला शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त ,समाज बांधव, आणि सामाजिक व राजकीय नेते मंडळी, तसेच ग्रामस्थांचा दिवसेंदिवस मोठा मिळत आहे. शुक्रवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी योगेश अडसुळे व आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी गायकवाड यांनी शेतकरी व स्थानिक जनतेचे , प्रश्न समस्या जाणून घेतल्या. रिलायन्स करीत असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांना आपली भूमिका मांडताना रिपाइं पक्ष आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना दिला. यावेळी त्यांनी उपोषण स्थळावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोबाईलवर संपर्क करून येथील तक्रारींचा पाढा वाचला. व आंदोलन तीव्र करणार असल्या बाबतची माहिती दिली. तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पेण तहसीलदार गुंजाळ यांना संपर्क करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन स्थरावर सकारात्मक भूमिका घेण्याबाबत आवाहन केले…