रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख वैजयंती ताई ठाकूर यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या कडे वेळोवेळी पाठपुरावा करून पनवेल तालुक्यातील तुराडे येथे जिमचे साहित्यासाठी साठी सात लाख रुपयांचा भरघोस निधी आणल्यामुळे तुराडे गावातील ग्रामस्थांनी वैजयंती ताई ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून वैजयंती ताई ठाकूर यांनी आपल्या जन्म गावी तुराडे येथे तरुणांसाठी जिम साठी लागणारे सात लाख रुपयांचे साहित्य उद्योगमंत्री नामदार सामंत यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवार दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या जिमचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी तुराडे ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना विश्वनाथ गायकवाड,उपसरपंच प्रिया प्रदीप माळी यांच्यासह ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य ग्रामविकास अधिकारी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…