पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुपग्रामपंचायत चिर्ले आयोजित ‘सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्ररोग निदान कार्यक्रम मंगळवार दि. १०.१२.२०२४ रोजी सकाळी ९ ते दु १.३० वाजे पर्यंत आयोजित करण्यात आला होता… या कार्यक्रमाचे आयोजन चिर्ले गावचे सरपंच सुधाकर पाटील यांनी केले होते… मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तसेच डोळ्यांचे विविध आजार व त्यावर मोतीबिंदू उपचार, डायबेटिज तपासणी, काचबिंदू आजार व त्यावरील चष्मा नंबर आणि चष्मा उपलब्ध करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले… त्याचप्रमाणे प्रशांत नाईक यांनी देखील नेत्र चिकित्सा आयोजनाचे महत्व समजावून सांगितले… या नेत्र चिकित्सा तसेच डायबेटीस तपासणीचा चिर्ले ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला…