दत्त जयंती निमित्त राजा भाऊ ठाकूर यांची श्रीवर्धन येथील गुरु देव दत्त मंदिरास भेट…

0
67

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील ) :-

शनिवारी दि. 14 रोजी काळींजे येथील दत्त मंदिरयेते “दत्त जयंती” चे औचित्य साधून काळींजे ग्रामस्थ मंडळ, महिला विकास मंडळ तसेच मुंबई मंडळातर्फे धार्मिक कार्यक्रमास ज्येष्ठ कॉंग्रेस नेते राजा भाऊ ठाकूर यांना खास निमंत्रित करून दत्त जयंती सोहळ्यास उपस्थित होते… राजा भाऊ यांनी आपल्या घरातील दत्त जयंती सोहळाची लगबग असतानाही श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे गाव येथे रात्री पाऊणे नऊच्या सुमारास भेट दिली…

यावेळी राजा भाऊ यांचे आताशबाजीने स्वागत करण्यात आले… तसेच महिलांनी त्यांची ओवाळणी करून स्वागत केले… तसेच माणगाव ता. काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, कार्यकर्ते धीरज तळे, मनोज जाधव आणि दिनेश खैरेही उपस्थित होते…. या दरम्यान काही दिवसापूर्वी संपन्न झालेल्या सर्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या काळातही 193 श्रीवर्धन विधानसभा उमेदवार म्हणून राजा भाऊ ठाकूर यांनी प्रचार काळात सदर काळींजे गावास भेट दिली होती… यावेळी राजा भाऊ ठाकूरसह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते… यावेळी काळींजे ग्रामस्थांना अतिशय आनंद झाला व आपल्याच घरातील किंबहुना गावतील प्रेम करत असलेल्या एक लाडका भाऊ म्हणून राजा भाऊ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले…. दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांनी देवळास देणगी दिली आणि आपले ऋण व्यक्त केले… ग्रामस्थांनी राजा भाऊ ठाकूर तसेच विलास सुर्वे यांचा सत्कार केला… दरम्यान या गावाचे रस्त्यावरील प्रवेश द्वाराजवळ राजा भाऊ यांचे खास स्वागतपर लावलेली बॅनर हे खास लक्ष वेधून घेत होते… आपला लाडका नेता राजा भाऊ ठाकूर आपल्या परिसरात आल्याची बाब समजताच गावातील अनेक तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध माऊली यांनी आमच्या गावात दोन मिनिट का असेना तर कृपया भेट देऊन जावे अशी विनंती राजा भाऊ यांना केली… तसेच आपल्या परतिच्या प्रवासातही ठीक ठिकाणी अनेक युवक वर्गाने राजा भाऊ ठाकूर यांची रात्री 11 च्या सुमारास भेट घेऊन संवाद साधत साधला…