पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार… इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते पार पडणार…

0
46

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघरमधील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून उद्घाटन सोहळापूर्व कार्यक्रमात कलश स्थापना, कीर्तन-प्रवचन, भजनसंध्या, अभिषेक होणार आहे. त्यात ११ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन, १२ जानेवारीला शुभधा वराडकर यांचे नृत्य, गीता राबरी यांचे विशेष गायन आणि लोकनाथ स्वामींचे प्रवचन होणार आहे.१३ जानेवारीला सायंकाळी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे श्रीकृष्ण जीवनावर आधारित नृत्य आहे, १४ जानेवारीला अनुराधा पौडवाल यांचा गीतगायन कार्यक्रम तर १५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यात वैदिक महाविद्यालय, भक्तीवेदान्त वाचनालय, वैद्यकीय सेवालय, गोशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम, वैदिक वस्तुसंग्रहालय, कल्चरल सेंटर आदींचे उद्घाटन तर आठ आचार्य आणि १० प्रमुख देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तसेच वैदिक म्युझियम आणि कल्चरल सेंटरचे भूमिपूजन होणार जाणार असल्याचे खारघर इस्कॉन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एच. जी. सूरदास यांनी सांगितले