दी लाईफ फाउंडेशन’ आणि ‘शंकरा आय हॉस्पिटल’च्या संयुक्त विद्यमाने… मोफत नेत्रतपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन…

0
44

 अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्या संकल्पनेनुसार आणि संयोजनाने, ‘दी लाईफ फाउंडेशन’  आणि नवीन पनवेलच्या ‘शंकरा आय हॉस्पिटल’च्या संयुक्त विद्यमाने धोकवडे ग्रामपंचायतींतर्गत मांडवा येथे मोफत नेत्रतपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे… या शिबिरात विनामूल्य ‘आयुष्मान भारत’ ओळखपत्र नोंदणी शिबीर देखील आयोजित करण्यात आलेले असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे….

यावेळी द लाईफ फाऊंदेशनचे रायगड जिल्हा समन्वयक श्री.शिलानंद इंगळे, समाजसेविका सौ.राखी राणे, श्री.प्रणव ओव्हाळ, पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलमधील टीम मॅनेजर श्री.विजय बामणे, डॉ. सोनाली सुभेकर, कर्मचारी कु.रुचिका जंगम, कु.सोनाली पंदेरे, कु.सागर पाटील तसेच मांडवा येथील कार्यकर्ते श्री.राजेश धुळे, श्री.गजानन पाटील, श्री.राजेंद्र कोळी, श्री.लवलेश पाटील, श्री.ओमप्रकाश किल्लेकर, श्री. गणेश कोळी, श्री.त्रिगुण पाटील श्री.दीपक कोळी, श्री.नीलेश पाटील, श्री.प्रीतम कोळी, श्री.विदेश कोळी, श्री.मनोज म्हात्रे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….