महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह मंगळवार दिनांक 17.11. 2024 रोजी महाराष्ट्र शासन आरोग्यसेवा यांच्यामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कुसुम अभियान 2024 25 अंतर्गत वस्तीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली… सदर तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर, श्री.हेमंत चिटके, उमाकांत सोमवंशी आदि आरोग्य सेवक उपस्थित होते…
यावेळी डॉक्टर नितीन बावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला… श्री हेमंत चिटके यांनी कुष्ठरोग संबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली… मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल सौ कुंदागिरी व स्वप्नाली धोत्रे यांनी हे अभियान यशस्वी पार पाडले… मुलांचे शासकीय वस्तीगृह गृहपाल अनिल मोरे यांनी प्रवेश प्रक्रिया तसेच येथील सोयी-सुविधांची सखोल माहिती दिली… यावेळी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानण्यात आले…