खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याची बाब असून मोबाईल फोन ही सद्या चैनीची वस्तू नसून गरजेचे उपकरण झालेले आहे. तथापि ब-याचवेळा आपल्याकडून मोबाईल फोन कोठेतरी विसरणे, पडून गहाळ होणे अशा बाबी होतात.याबाबत मोबाईल मालक आपली तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करतात… रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना नव्याने शोध घेण्यासाठी आदेश पारित केले… उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी जानेवारी २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत राज्यात आणि परराज्यात शोध घेऊन ७१ मोबाईलचा शोध लावला… यांची किंमत सुमारे १०,३८,४००/- इतकी असून १७८ मोबाईल हरवल्याची नोंद आहे… गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस शिपाई अभिजित व्हरांबले आणि अमोल राठोड यांनी विशेष प्रगटीकरण केल्याने त्यांचे कौतुक विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी केले…सापडलेल्या ७१ फोनचे वाटप आज त्यांच्या हस्ते करण्यात आले… यावेळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, खालापूर पोलीस वरीष्ठ निरीक्षक सचिन पवार यांच्यासह मोबाईल धारक, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते…