अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील ओयोशान येथील कुंटणखान्यावर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या सूचनेनुसार, अलिबाग पोलिस उप विभागीय विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,व बांगलादेशी पथक यांनी संयुक्त कारवाई करीत पती पत्नी सहित इतर तीन व वारागंणा यांना ताब्यात घेतले आहे.चेंढरे येथील हॉटेल ओयो शान येथील कुंटणखाना सुरू असल्याची फिर्याद अलिबाग पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उप निरीक्षक अनील वसंतपुरी गोसावी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अलिबाग पोलिस विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसापूर्वी अलिबाग पोलिस ठाणे येथे चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या आयोशान येथे शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल यांच्या देखरेख खाली कुंटणखाना सुरू असून हॉटेलमध्ये येणारे ग्राहक यांना वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवून लैंगिक अत्याचार करीत असल्याची महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली होती. मिळालेली माहिती अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी पोलिस उप अधीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहिती दिली… दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अलिबाग पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,व बांगलादेशी पथक यांनी एकत्रित येत त्यांनी हॉटेल मध्ये प्रवेश केले असता पहिल्या माळ्यावरील रिसेप्शन काउंटर येथे मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल (दोघेही राहणार हॉटेल शान ओयो लॉजिंग, एचपी पेट्रोलपंपाचे मागे, चेंढरे ता- अलीबाग, रायगड, महाराष्ट्र, भारत ) यांना ताब्यात घेवून त्यानंतर उपस्थित पंचासमक्ष हॉटेलची पाहणी केली असता तीन मुली ह्या वेश्याव्यवसाय करीत असतांना मिळून आल्या आहेत… तसेच त्यांच्याकडून 20 हजार 500 रुपये रोख व दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे…सदर कारवाई ही अलिबाग पोलिस उप विभागीय विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर साळे, यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी कर्मचारी, तसेच बांगलादेशी पथक मधील कर्मचारी यांनी केली आहे.
याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात 206/2024 , भारतीय न्याय संहिता 2023चे 143,3(5), स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) 3,4, 5 नुसार कारवाई केली असून अधिक तपास महीला पोलिस उप निरीक्षक शिंदे या करीत आहेत.