उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरणच्या १३ वर्षीय आर्यन किशोर पाटीलने आपल्या वडिलांच्या ५० व्या वाढदिवशी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. धरमतर ते कासा खडक हे सागरी २४ कि. मि. अंतर जलतरणातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘बटरफ्लाय’ प्रकारामध्ये पोहून पार करत जागतिक विक्रम केला आहे. बटरफ्लाय प्रकारामध्ये खुल्या समुद्रामधील लांब पल्ल्याचे जलतरण करणारा तो जगातला सगळ्यात लहान जलतरणपटू ठरला आहे. याची नोंद ‘इंटरनॅशनल एक्सीलेन्स अवॉर्ड’ ने घेत त्याला सन्मानीत देखील केले आहे.
उरणच्या केगाव दांडा येथे राहणारा आर्य किशोर पाटील हा सेंटमेरीज हायस्कुल, उरणमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत असून, तो उत्तम जलतरणपटू आहे. तर त्याचे वडील किशोर पाटील हे राष्ट्रीय कोच आहेत. वडिलांचे जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करावें या प्रबळ इच्छेने आर्यने मोठा सराव करत १८ डिसेंबरला जागतिक विक्रमची नोंद केली आहे…अवघ्या १३ व्या वर्षी केलेल्या विक्रमबाबत बोलताना आर्य याने विक्रम करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत. तर त्याच्या वडिलांना आपल्या मुलाच्या विक्रमबाबत बोलताना भावना अनावर झाल्या…अत्यंत कठीण आणि प्रचंड ताकद लागणाऱ्या ‘बटरफ्लाय’ या जलतरण प्रकारातून २४ कि. मि. अंतर पोहून जाणार आर्य किशोर पाटील हा जगातील सवात लहान जलतरणपटू ठरला असून, याची नोंद विविध संस्था आणि शासकीय यंत्रणानी घेतली आहे. तर विक्रमानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.