५०० रुपयांसाठी नवऱ्याने घरात घेतला गळफास…व्हाट्सअपवर बायकोकडे मागितले होते पैसे… 

0
108

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन ) :-

रायगड जिल्ह्यातील बोपेले येथे पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पती शशांक शाम गायकर(४४ वर्षे, रा. फ्लॅट नं.२०५ एनकारीष सोसायटी, बोपरे, तालुका-कर्जत, जि. रायगड) याने आत्महत्या केली असल्याबाबतची फिर्याद पत्नी युगंधरा शशांक गायकर यांनी नेरळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,कर्जत तालुक्यातील मौजे बोपेले येथील मृत शशांक शाम गायकर हा काही काम धंदा करीत नव्हता त्याला खर्चासाठी लागणारे पैसे मृत  यांच्या पत्नी युगंधरा शशांक गायकर या देत होत्या. दिनांक १८/१२/२०१४ रोजी १२.३५ वा सुमारास यांतील मृत याने पत्नी युगंधरा गायकर यांच्याकडे मोबाईलद्वारे व्हाट्सअप करून खर्चासाठी पाचशे रुपये मागितले. मात्र पत्नी युगंधरा हीने मृत शशांक यांना पाठविलेल्या व्हॉटसअप मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही…तसेच मृत शशांक हा वारंवार फोन करत असल्याने त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवला तसेच त्यांनी मागणी केलेले पाचशे रुपये देखील ऑनलाईन पाठवले नाही याचा राग आल्याने
मृत याने राहत्या घरी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन ते रात्री नऊच्या दरम्यान सीलिंग फॅनला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे…याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाुसार पोलिस हवालदार लोखंडे करीत आहेत.