पनवेल,उरण,पेण,कर्जतचा गड पुन्हा काबिज करणार…खारघरमधील मेळाव्यात शिवसैनिकांचा निर्धार…

0
45

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे खचून न जाता नव्या जोमाने समाजकार्य सुरू करण्यात आले आहे. या नियोजनबद्ध सामाजिक ताकदीच्या जोरावर शिवसेना पनवेल, उरण, पेण, रायगडचा गड पुन्हा काबिज करणार आहे, असा निर्धार शिवसैनिकांनी खारघर येथील मेळाव्यात केला आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत आदी उपस्थित होते…पनवेल आणि कर्जत विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यासाठी खारघर येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संपर्क साधला…याप्रसंगी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगरप्रमुख अवचित राऊत, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख, प्रदीप केणी, उपजिल्हा संघटक रेवती सकपाळ, विधानसभा संघटक सुजाता कदम, महानगर संघटक लिना गरड, तालुका संघटक अनिता डांगरकर, उपतालुका संघटक तनुजा झुरे, पनवेल शहर संघटक अर्चना कुळकर्णी, संगीता राऊत, संपदा धोंगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते…