संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान…विधानभवन परिसरात महाविकासाघाडीचे आंदोलन…  

0
42

नागपूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. शाहा यांच्या वक्तव्यावरून ‘इंडिया’ आघाडी आक्रमक झाली आहे. याचे पडसाद राज्यविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेसनामध्ये आज (दि.१९) पाहायला मिळाले. याच्या निषेधार्थ विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी संविधान चौक येथे काँग्रेस आमदारानी हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन घोषणा देत या वक्तव्याचा निषेध केला. तसेच माफी मागण्याची मागणी केली. यानंतर सर्व सदस्य सभागृहाच्या दिशेने घोषणा देत निघाले. मुख्यद्वारातून विधानभवनाकडे प्रवेश करताना आंबेडकर, आंबेडकर…बाबासाहेब का अपमान नही सहेगा हिंदुस्तान ! अशा जोरदार घोषणा देत काँग्रेस व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहांच्या पायऱ्याजवळ पोहोचले व येथे जोरदार घोषणाबाजी केली.कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान, माणसाला माणूस बनवण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले अशा महामानवाविषयी या वक्तव्याने भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची भूमिका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकर… बाबासाहेब आंबेडकर असा सतत जयघोष करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला. एकच साहेब बाबासाहेब.. अशा घोषणा ही यावेळी देण्यात आल्या…महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजीत वंजारी, भाऊ जगताप, सचिन अहिर, नितीन राऊत, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, वरूण सर्देसाई, रोहित पवार, भास्कर जाधव, अभिजीत वंजारी, भाई जगताप, विकास ठाकरे, ज्योती गायकवाड, रोहित पाटील, प्रकाश गजभिये, काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार निळ्या टोप्या व दुपट्टे परिधान करून आंदोलनात सहभागी झाले होते…