एप्लस फाउंडेशनतर्फे झेडजेस्ट 2024 पुरस्कार सोहळा…21 डिसेंबर ते 29 डिसेंबरला पनवेल येथे भव्य आयोजन… 

0
50

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-  

एप्लस फाउंडेशनतर्फे झेटजेस्ट 2024 या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पनवेल येथे 21 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. वेफेयर एस. पी. रिसॉर्ट पोयंजे पनवेल येथे हा भव्य पुरस्कार सोहळा असेल. ए प्लस फाउंडेशन ही नोंदणीकृत धर्मादाय सामाजिक संस्था आहे. एप्लस फाउंडेशन च्या मुख्य अध्यक्षा सौं. चांदणी मेहता, झेटजेस्ट 2024 या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक आणि अभिनेते राज सेहगल, इव्हेंट्स मॅनेजर सुनिल घोडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनपर हा पुरस्कार सोहळा पनवेलला होणार आहे. या  पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी चित्रपट सृष्टी, बॉलीवूड, हॉलिवूड, हिंदी सिनेसृष्ठीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत… तसेंच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील नामवंत मंत्री, नेते, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार सुद्धा विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत. हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू असा कि गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना, वृद्धाणा, महिलांना विविध प्रकारची मदत करून त्यांना स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभारणे, आर्थिक सक्षमीकरण, आजारपणात उपचार, अशा विविध योजना ए प्लस फाउंडेशनमार्फत राबविण्यात येतात. तर या संस्थेला मिळणारा निधी हा अगदी अल्प स्वरूपाचा असून अशा प्रकारे इव्हेंट्स, पुरस्कार सोहळे, आयोजित करून किंवा अन्य मार्गाने हे फंड्स गोळा करून या योजना राबविल्या जातात. या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थिती लावून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन एप्लस फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध कला गुण दर्शनाचा अविष्कार विविध जुन्या आणि नवीन कलाकारातर्फे केला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला जे कलाकार सहभागी होतील त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यांना रोख रक्कम स्वरूपात व उ्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे.या कार्यक्रमाचा उद्देश नवीन कलाकारांना त्यांच्या गुणप्रदर्शनासाठी संधी देणे हाच आहे.