पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल):-
शनिवार दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील गडब गावातील तरुण मितेष जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केली व त्यात तो मृत्युमुखी पडला…
या गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि प्रशासनाला सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी श्रद्धा सबुरी मित्र मंडळ गडब, वाशी यांच्या वतीने गडब येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते… यावेळी साई मंदिरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी मेणबत्ती पेटवून मितेशला श्रद्धांजली वाहिली…
यावेळी या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करुन मितेशला न्याय मिळाला पाहीजे व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहीजे तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, अशी मागणी करुन मितेशला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार आसल्याचे उपस्थितांनी मितेशला श्रध्दाजंली वाहताना सांगितले…
जोपर्यंत मितेशला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले…