भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची रिक्षाला धडक…अपघातात रिक्षातील तिघेजण गंभीर जखमी…

0
109

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

मोहोपाडा बाजूकडून आपट्याच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तिघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना शनिवारी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास लोना कंपनीजवळ घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,आपटाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात टेम्पोने रिक्षा क्र.M.H.06V.2766ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आपटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून रिक्षातील प्रवासी अंकुश सुखाजी गावंड(५५)अनिता अंकुश गावंड (४५)व प्रभावती आत्माराम पाटील (६०) रा.जिते या.पेण यांना एम.जी.एम. रुग्णालयात पुढील उपचाराथऀ दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.या अपघाताचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मदन पाटील हे करीत आहे