उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर… भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा… खमंग, झणझणीत पदार्थ म्हणजे वडापाव…खवय्यांच्या जीभेला पाणी सोडणारा स्ट्रीट फूड असलेला वडापाव ‘लोकल टू ग्लोबल’ झाला आहे.महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये वडापाव अविभाज्य घटक झाला आहे…हाच वडापाव खाद्यप्रेमी आनंदाने रोज खात असतात…पण तुमच्या आवडणाऱ्या वडापावमध्ये अस्वछता असेल तर तुम्ही तो खाऊ शकाल का ? उरण तालुक्यातील कोप्रोली येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे…उरण तालुक्यातील कोप्रोली नाक्यावरील समर्थ वडापाव दुकानात, गलिच्छ वस्तू आणि साधनाचा वापर करून वडापाव तयार करीत असल्याबद्दलचा व्हीडीओ गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारयल झाला.या दुकानात पूर्व विभागात असणाऱ्या गावातील बरीच लोकं इथ भज्जी, वडापावसारखे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात.. पण इथ मात्र हात धुवण्यासाठीच्या असणाऱ्या सांडपाणीच्या बकेटमध्येच त्या पदार्थाचे पीठ बनवले जातेय…अतिशय घाणेरड्या ठिकाणी हे वडापाव बनवले जात आहेत…उद्या जर आरोग्याला हानिकारक घटना घडली तर त्याला जिम्मेदार कोण ? समर्थ वडापाव सेंटरवर अन्न औषध प्रशासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी वडापाव खव्वयानी केली आहे…