रायगडात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची चिन्हे… रोह्यात अदिती तटकरेंचे भावी पालकमंत्री बॅनर झळकले…

0
41

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत आता पालकमंत्री पदावरून अनेक ठिकाणी वाद उफाळल्याचे दिसून येते. रायगडच्या रोहा शहरामध्ये राष्ट्रवादीच्या महिला व बालविकास मंत्री अदिती  तटकरे यांच्या भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेत…राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पदावरून एकीकडे वाद सुरू असताना त्याअगोदर मंत्री अदिती तटकरे यांना भावी पालक मंत्री म्हणून  शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात वाद पेटण्याची शक्यता आहे…